itemtype="https://schema.org/Blog" itemscope>

joymarathi

निबंध : सहल(३०० शब्दात) / Aamchi Sahal Essay in Marathi :-

Aamchi Sahal Essay in Marathi

निबंध : सहल

वेरूळ अजंठा ही साऱ्या जगाने भेट द्यावीत अशी पर्यटन केंद्रे. अशा केंद्रांना भेटी देणाऱ्यात भारतीय नागरिकाबरोबर परदेशी हौशी प्रवासीही असतात. प्राचीन भारतीय सांस्कृतिक जीवनाचा चल चित्रपटच येथे पहायला मिळतेय. मग कोणाला अशी स्थळे पहावीत असे वाटणार नाही.

मला ही ठिकाणे पहाण्याचा मोह अनावर झाला होता. त्यामुळे शाळेतर्फे ‘अजंठा’ पहाण्यासाठी सहल निघणार असून इच्छुकांनी आपापली नावे नोंदवावीत. अशी नोटीस काढली होती. मी नोटीस मिळताच पैसे भरून माझे नांव पक्के केले होते.

नियोजित वेळी आमची सहल निघाली. आम्ही विद्यार्थी मोठ्या संख्येने सामील झालो. दोन एस. टी. बसेस ऐवजी चार घ्याव्या लागल्या. गाड्या मिळाल्या तरी ड्रायव्हर चांगले मिळणे कठीण काम असते. तेही काम फत्ते झाले. ठरल्याप्रमाणे आम्ही अजंठाला पोहोचलो.

मी अजंठ्याला जे पाहिले ते अविस्मरणीय असे सौंदर्य होते. ज्या काळात या कलाकृती साकारल्या त्या काळाचे चित्रण करणे मोठ्या कसरतीचे काम आहे. कारण मोठमोठ्या रसिकांना व हळूवार संस्कारक्षम मनाच्या कवींनाही जे शक्य झाले नाही तेथे आमच्यासारख्या पोरापारींची कथा काय?

Aamchi Sahal Essay in Marathi

अजिंठा लेणी ह्या तालुका सोयगाव छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील इ.स. पूर्व २ रे शतक ते इ.स. ४ थे शतक अशा प्रदीर्घ कालखंडात निर्मिलेल्या २९ बौद्ध लेणी आहेत. छत्रपती संभाजीनगर शहरापासून १०० ते ११० कि.मी. अंतरावर वाघूर नदीच्या परिसराशेजारी या लेणी आहेत. ह्या लेणी नदीपात्रापासून १५-३० मीटर (४०-१०० फूट) उंचीवर विस्तीर्ण अशा डोंगररांगामधील कातळांवर कोरल्या आहेत.

बौद्ध धर्माचा वारसा जतन करणारी प्रदीर्घ ऐतिहासिक कालखंडाची पार्श्वभूमी लाभलेली अजिंठा लेणी या भारताची जागतिक आंतरराष्ट्रीय पर्यटनासाठी ठळक ओळख करून देणाऱ्या महत्त्वाच्या लेणी आहेत. लेणी घनदाट जंगलाने वेढलेल्या आहेत. भारताच्या केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या प्रतिष्ठित पर्यटन स्थळ प्रकल्पात देशातील १२ पर्यटन स्थळांची निवड करण्यात आली असून महाराष्ट्रातील अजिंठा व वेरूळच्या लेण्यांचा या यादीत समावेश आहे.

अजिंठा लेणी ही जागतिक वारसा स्थान म्हणून युनेस्कोने इ.स. १९८३ साली घोषित केली आहे.आणि या लेण्यांना भारतातील पहिल्या जागतिक वारसा स्थळाचा मान आहे. जून २०१३ मध्ये महाराष्ट्राच्या सात आश्चर्यांची घोषणा करण्यात आली असता त्यात अजिंठा लेणी हे प्रमुख आश्चर्य ठरले आहे.

लेण्यांमधील चित्रांपैकी एका लेण्याचे चित्र भारतीय चलनातील २० रुपयांच्या एका नोटेवर आहे.

अजिंठा लेण्यांत गौतम बुद्धाच्या विविध भावमुद्रा तसेच बौद्ध तत्त्वज्ञानाला चित्रशिल्प रूपात व्यक्त करणाऱ्या शिल्पकलेचा अद्वितीय आविष्कार पाहायला मिळतो. अशी ही अजिंठा लेणी देशी पर्यटकांसोबतच प्रामुख्याने विदेशी पर्यटकांच्या सर्वाधिक पसंतीचे पर्यटन स्थळ ठरले आहे. चित्र—शिल्पकलेचा नितांतसुंदर अनुभव देण्याऱ्या या लेण्यांमधून त्या काळात वापरण्यात आलेल्या रंगछटा पर्यटकांना पाहावयास मिळतात., ह्या परिच्छेदात Aamchi Sahal Essay in Marathi इतिहास दर्शेवलेला आहे.

वरील निबंध Aamchi Sahal Essay in Marathi – ३०० शब्दांचा आहे अधिक माहितीसाठी खालील माहितीं वाचा.

आमची सहल

अजंठ्याच्या कलाकृती अजिंक्य व अजरामर तयार करण्यात आल्या. रसिकांच्या मनाला अतृप्त समाधान देणाऱ्या या कलाकृती आहेत. कवी मनांची आस पूरी करणाऱ्या या कलाकृती आहेत. कलाकरांच्या अस्मितेला अद्भूत प्रेरणा देणाऱ्या आणि सामान्य माणसाला चकीत करून सोडणाऱ्या या कलाकृती आहेत. या कलाकृतीच्या स्वरूपात भावनेची भूक भागविण्याची शक्ती आहे. त्यामुळे मानसिक समाधान मिळते.

अप्रतिम आनंद होतो. स्वाभाविकपणा, भावनोत्कटता, यथार्थ भावदर्शन, तरल प्रतिमा चित्रांना व मूर्तीना अमरत्व निर्माण करून दिलेले आहे. कलेची मोहकता मनाला मोहिनी घालून जाते.

येथे प्राचीन संस्कृतीचे प्रसंगानुरूप दर्शन घडते. त्यातील प्रत्येक प्रसंगाशी प्रेक्षक एकरुप होतो. त्या त्या प्रसंगातील व्यक्तित्व आपण धारण करतो. भावनांचे उदात्तीकरण पहायला मिळते. येथील चित्रे व चित्रांसाठी वापरलेले रंग मानवी मनाला मोहून टाकतात.

प्राचीन भारतात धर्मशाळा, लेणी क्वचित मंदिरेसुद्धा मुख्यत्वे व्यापारी मार्गांवर विश्रांतीसाठी उभारण्यात येत असत. त्यांचा उद्देश वाटसरूंना सुरक्षित आश्रय स्थान मिळावे असा असे. त्यांना राजाश्रय, धर्माश्रय व लोकाश्रय असे. अजिंठा गावाजवळच्या लेण्यांची निर्मितीही याच उद्देशातून सुरू झाली असावी असे मानले जाते.

आमची सहल

या लेण्यांचा शोध ब्रिटिश भारताच्या मद्रास इलाख्यातील ब्रिटिश अधिकारी Jhon Smith हा वाघाच्या शिकारीसाठी गेल्याने २८ एप्रिल, इ.स. १८१९ रोजी लागला. स्मिथने येथील दहाव्या क्रमांकाच्या लेणीतील एका खांबावर आपले नाव आणि तारीख कोरून ठेवल्याचे आजही अंधुकपणे दिसून येते.

पुरातत्त्वशास्त्रीय पुराव्यानुसार ही लेणी दोन वेगवेगळ्या कालखंडांत निर्माण केली गेली. ९, १०, १२, १३ व १५-अ ही लेणी हीनयान कालखंडात कोरली गेली असावीत. हा कालखंड साधारणतः इ.स. पूर्व दुसऱ्या शतकाच्या सुमारास सुरू झाला.या सगळ्या लेण्यांतून बुद्धांचे दर्शन स्तूप-रूपांत होते. या व्यतिरिक्त १ ते २९ क्रमांकांची लेणी साधारणतः ८००-९०० वर्षांनंतर (इ.स.च्या सहाव्या व सातव्या शतकाच्या आसपास) महायान कालखंडात निर्माण केली गेलेली असावीत.

या लेण्यांतून बुद्धांचे सर्वसामान्य लोकांस परिचित असे रूप दिसून येते.महायान लेणी वाकाटक राजांच्या राजवटीत निर्मिली गेली, त्यामुळे त्यांस बऱ्याचदा वाकाटक लेणी असेही संबोधले जाते. वाकाटक साम्राज्याच्या ऱ्हासानंतर लेण्यांची निर्मिती अचानक थांबली व ही लेणी योजित भव्यतेपासून वंचितच राहिली..

अजंठा येथील चित्रे फक्त सहा मोजक्या रंगात व अतिशय टिकावू स्वरूपात रंगविलेली आहेत. सर्व अंगे परिपूर्ण असलेल्या या चित्रांतून गोड समन्वय साधण्याचा यशस्वी प्रयत्न केलेला आहे, स्वर्गातून खाली उतरणारे देवदूत, गौतमबुद्धांच्या जीवनाच्या तीन अवस्थांचे दर्शन घडविणाऱ्या बुद्धमूर्ती, भिक्षाटनाचा प्रसंग, शिवपार्वती शुभविवाह, वेरूळचे कलाशिल्प आकर्षण वाढविणारी आहेत. हे सौंदर्य तासनतास पहात बसावे असे वाटते.

अजिंठा निर्मिती करणाऱ्या कलाकारांनी विहार आणि चैत्य अशा दोन प्रकारे या लेण्यांची निर्मिती केलेली आहे.या लेण्यांमधील भिंती आणि छतांवर चितारलेल्या चित्रांमधून भगवान बुद्धांच्या जीवनातील विविध प्रसंग आणि अनेक बौद्ध विभूतींचे चित्रण आढळते. जातक कथांच्या आधारे केलेले कथांचे अंकन या लेण्यांमध्ये दिसून येते.

बौद्ध धर्मातील हीनयान आणि महायान अशा दोन संप्रदायांचे तत्त्वज्ञान अजिंठा लेण्यात पाहायला मिळते. उत्खनने आणि बौद्ध धर्माचे उपलब्ध साहित्य याच्या आधारे अभ्यासक विविध मते नोंदवीत असतात. त्यांच्या मतानुसार हीनयान संप्रदायाच्या लेण्यांमध्ये चैत्यगृह पाहायला मिळते, मात्र महायानपंथीय लेण्यात चैत्यगृहांचा समावेश नसतो. चैत्यगृह म्हणजे स्तूप असलेले मंदिर होय.

वेरूळचे कैलासशिल्प हा एक स्वर्गीय आभास आहे. या शिल्पाचे दिव्य- भव्य कोरीव काम पाहून आमची मने वेडावून गेली होती. क्षणभर आम्ही स्वर्गातूनच संचार करतो आहोत असे वाटल्याशिवाय राहिले नाही. येथील मूर्ती सजीव वाटल्या. त्या आमच्याकडे धावत येत आहेत. आमच्याशी हितगुज करताहेत असेच क्षणभर वाटले. तेथील नृत्यांगना नुपुरांच्या झंकाराच्या नादात पुढे पुढे चालत येत आहेत असा भास झाला. हे सारे पाहून स्वर्गीय सुखाचा अनुभव घेत असल्यासाखे क्षणभर वाटल्याशिवाय राहिले नाही..

वेरूळची बौद्ध लेणी येथील सगळ्यात जुनी लेणी आहेत. ही लेणी मुख्यत्वे विहार रूपाची आहेत. काही विहारांतून पूजेसाठी मूर्तीही आहेत.येथे वीस खांबांवर आधारित एक दालन आहे. या खांबांवर सुंदर असे नक्षीकामही केलेले आहे. भगवान बुद्धांच्या पूर्वजन्मावर आधारित जातक कथा येथील चित्रांत दिसून येतात. बुद्धाच्या विविध प्रकारच्या मुद्रा, पद्मपाणी, दरबार दृृश्य, पक्षी, फुले, फळे यांचे छतांवरील अंकन या लेण्यात पहायला मिळते.
यामध्ये डाव्या बाजूस हंसाच्या जन्माची कथा आहे. बुद्धांची आई महामाया आपले स्वप्न पती राजा शुद्धोधनास सांगत आहे. बुद्धांचा जन्म, छतावरील नक्षी यांचे अंकन या लेण्यात केलेले दिसते.

हा निबंध Aamchi Sahal Essay in Marathi शालेय विध्यार्थी साठी आहे.

आमची सहल

अंधकासुर वध हे शिल्प अतिशय प्रत्यककारी आहे. खालील परिच्छेदात Aamchi Sahal Essay in Marathi अंध्कासुराचे वर्णन केले आहे.

खवळलेल्या, क्रोधाने दग्ध झालेल्या आठ हात असलेल्या शंकराने एक पाय मुडपून आपल्या हातातली तलवार जोराने अंधकासुराच्या छातीतून आरपार खुपसलेली आहे. शिवाचे खोबणीतून बाहेर आलेले डोळे, कपाळावरचा उमलू पाहणारा तिसरा डोळा व भयानकपणे विचकलेले  दात त्याला आलेला भयानक क्रोध दर्शवत आहेत. तर आपला अंतःकाळ आता जवळ आलेला आहे हे ओळखून अंधकासुर दोन्ही हात जोडून त्याची क्षमा मागतोय. 

शिवाच्या उजवीकडे खालच्या बाजूला पार्वती बसली असून पतीचा हा पराक्रम पाहून तिला वाटत असलेले कौतुक तिच्या चेहर्‍यावर विलसत आहे. शिवाने एका हातात वाडगा धरलेला असून  अंधकासुराचे पडत असलेले रक्त तो त्यात गोळा करतो आहे. अंधकासुराचे पापी रक्त पार्वतीच्या अंगाला लागू न देणे म्हणूनच ही योजना. शिवाच्या दुसर्‍या हातांमधली तलवार, डोक्यावर धरलेले चाबूकरूपी गजचर्म ही आयुधेपण अतिशय प्रेक्षणीय अशी आहेत.

यांपैकी प्रसिद्ध लेणे म्हणजे विश्वकर्मा लेणे. अनेकमजली प्रवेशद्वारातून आत गेल्यावर आपण स्तूपापाशी पोचतो. या स्तूपाच्या वरच्या भागातील दगड जणू लाकडी वासाच वाटावा असा कोरलेला आहे. या स्तूपात बुद्धाची धर्मचक्रप्रवर्तनमुद्रेतील मूर्ती आहे, असे असले तरी ठराविक वेळेनंतर निघणे भाग होते. त्यामुळे शिक्षकांच्या समवेत आम्ही परत जाण्यासाठी निघालो. गाड्या गाठून लवकर प्रवास करणे भाग होते.

आम्ही प्रत्यक्ष गाडीत बसलो. गप्पा-टप्पा सुरू झाल्या पण या गप्पासुद्धा वेरूळ अजंठ्याच्या रंग शिल्पांच्याच होत्या. येथील सौंदर्याने आमची मने इतकी भारावून टाकली होती की दुसरे काही सुचायला तयार नव्हते. अगदी घरी पोहोचेपर्यंत हेच वातावरण टिकून राहिले होते. घरी पाहोचल्यावरही आम्ही सहलीत काय काय पाहिले याचीच तोंडभर बोलणी करीत होतो. घरची लहानथोर मंडळी पण कान देवून आमचे सांगणे ऐकत होती..

खरोखर सहली काढल्या जातात त्या फक्त स्वैराचारासाठी निश्चितच नाहीत. येथे खूप कांही पहायला मिळते. खूप काही अनुभवायला मिळते. खूप काही शिकायला मिळते. अनुभवलेल्या ज्ञानाने मने समृद्ध होतात. अनुभवलेल्या सौंदर्याने अंतःकरणाला वेगळीची मोहकता येत असते. आनंद आणि उत्साह येतो. वेरूळ आणि अजंठा या दोन ठिकाणांच्या स्वर्गीय दर्शनाने आम्हांला हा खास अनुभव आलेला होता. त्यामुळे मी कोणतीही सहल चुकवायची नाही असा निर्धार केलेला आहे.

या Aamchi Sahal Essay in Marathi निबंधाचा use कॉलेज चे विध्यार्थी सुद्धा करू शकतात.

तर मित्रांनो कसा वाटला Aamchi Sahal Essay in Marathi निबंध आवडला असेल तर जरूर कॉमेंट करा.

खालील निबंध जरूर वाचा.

For More information on essay on My School Trip in English :- Link here

Thank You for your valuable time…!

Leave a Comment