Essay on Nature in Marathi
निसर्ग एक थोर शिक्षक
Essay on Nature in Marathi : ग्रंथ हाही गुरू आहे. मानव हाही गुरू आहे. अनुभव हाही गुरू आहे. पण याहीपेक्षा प्रभावीपणे ज्ञान मिळविण्यास थोर गुरू नाही. तो निरपेक्ष ज्ञान देत असतो. हातचा कांही राखून ठेवत नाही. निसर्गाच्या सान्निध्यात ज्ञानाचा लाभ हसत खेळत मिळत असतो. आनंदाबरोबर, उत्साहाबरोबर निसर्गापासून ज्ञानाचाही लाभ घडत असतो. त्याकरिता काही फी मोजावी लागत नाही. पण त्याच्याशी जवळीक करणं त्याच्याशी हितगुज करणं भाग आहे. Essay on Nisarg in Marathi
यामुळे एकजिनसी व्यक्तिमत्वाच्या आकारण्याला मदत होते. निसर्गाचं विविध रंगी सौंदर्य, प्रशांत, शांतता, तेजाची भव्यता, तारकांची तेजस्विता, चांदण्याची शीतलता आणि प्रभातकाळची प्रसन्नता मानवी मनाच्या उद्दीपीकरणाला मदत करतात आणि त्यामुळे व्यक्तिमत्वाचा विकास साधला जातो.
औषधांच्या वापराने काही असाध्य आजार बरे केले जात नाहीत, तेंव्हा निसर्ग उपयोगी पडतो. निसर्गोपचार कृत्रिम औषधांच्यापेक्षा प्रभावी ठरताना आपण पाहतो. महात्मा गांधीनी याकरिताच निसर्गोपचारांना महत्त्व दिले जाते. Essay on Nature in Marathi
आजही पुण्याच्या परिसरात उरळीकांचन येथे एक निसर्गोपचार केंद्र सुरु असल्याचे आजही पाल्हापूर जिल्ह्यात जयसिंगपूरची हवाच इतकी अल्हादायक आहे की लीमुळे निसर्गतः च क्षयरोगाचा विकार कमी कमी होत जातो.Essay on Environment in Marathi Language.
आजच्या धावपळीच्या जगात माणसाला निसर्गाशी हितगुज करायला सवडच सापडत नाही. तो दररोजच्या जगण्यासाठी चालविलेल्या झगड्याने दमून बालों वसंत बापटांची ‘दख्खनची’ मानवाने निसर्गाकडे दुर्लक्ष केल्याची तक्रार करत आहे. निसगनि सौंदर्याचे भांडार खुलं करून टाकलेले असताना माणसाला तिकडे डोळे भरून पाहाण्याची बुद्धीही होऊ नये, यामुळे ती खंत करते आहे. Essay on Nature in Marathi.
निसर्गाकडून आपणाला आपले मन आनंदित करुन घ्यायचं असेल तर आपण “Childlike” व्हायला हवे. “Childish” नव्हे. लहान मुलांच्या मनाप्रमाणे निसर्ग निर्मळ, निष्पाप असतो. येथे द्वेषाला थारा नसतो. मत्सराला जागा नसते. लहान मूल अनुभवानेच शहाणे होते. प्रत्येक ठिकाणी त्यांची जिज्ञासा जागृत असते. जिज्ञासापूर्तीसाठी धडपड चालू असते.
अपंगांना कर्तव्यतत्पर करण्यासाठी बाबा आमटे यांनी नाही का निसर्गाकडेच धाव घेतली. गजबजलेल्या जगापासून दूर जंगलभागात त्यांनी आपले आनंदवन स्थापन केलं. इथे त्यांना बाह्य जगाचा वारादेखील ध्येयनिष्ठेपासून विचलीत करायला असमर्थ आहे.
आपण निसर्गाच्या सान्निध्यात जाण्यासाठी मिळणाऱ्या प्रत्येक संधीचा लाभ घेतला पाहिजे. त्याच्यापासून जे जे शिकता येण्यासारखं आहे ते शिकून घेतलं पाहिजे. निसर्ग आपणास ज्ञान द्यायला तयार आहे. पण त्या ज्ञानाचा स्वीकार करण्याची तयारी असायला पाहिजे.
निसर्ग माझा मित्र
निसर्ग सर्वश्रेष्ठ आहे. सुंदर निसर्ग पाहताना मनात आनंदाचे तरंग उठतात. सुंदर नद्या, हिरवागार उंच उंच डोंगर, पशु, पक्षी, पाहून आपण ताजेतवाने होतो. Essay on Environment in Marathi Language
अफाट निसर्ग सौंदर्य पाहून मनावरचा ताण हलका होतो. नवीन विचार सुचतात. शुद्ध हवा मिळते. ज्ञानात भर पडते. बौद्धिक विकास होतो. शारीरिक आरोग्य अति उत्तम रहाते. सूर्यास्त आणि सूर्योदयाचे दृष्य अप्रतिम दिसते. डोंगर, दऱ्या डोंगर कोरून केलेले बोगदे झाडे झुडुपांनी बहरलेले नागमोडी वळणाचे रस्ते, उमलणारी फुले, त्यांचे विविध रंगछटा सारेच आनंददायी वाटते. वेगवेगळ्या रंगांची दुनिया निसगनिच मानवाला शिकविली हिरव्या रंगाने डोळ्यांनाही शांतता वाटते.
जीवनात ताजेपणा भरतो. निसर्ग हाच खरा आपला मार्गदर्शक मित्र आहे. विशाल निळे आकाश, अथांग पसरलेला सागर पाहून माणसाचे मन मोठे विशाल होते. पंखात ज्ञानाचे बळ येते. प्रगतीच्या दिशेने झेप घेतो. कडेकपारीमधून वाहत येणारी नदी, धबधबे गतीमान व्हा असा संदेश देतात. मधमाशा सदा कार्यरत रहा असे सांगतात. Essay on Nature in Marathi.
एवढीशी मुंगी शिस्त शिकविते. वासाची फुले हसवतात. मन प्रसन्न करतात. निसर्गाचे मानव प्राण्यावर खूप उपकार आहेत. परंतु आपण निसर्गाची काळजी घेण्याऐवजी दुर्लक्ष करतो. म्हणून काही वेळेला, त्सुनामी चक्री वादळे, भूकंप अतिवृष्टीमुळे निसर्ग खवळतो. त्याच्या या इशाऱ्याकडे सर्वांनी लक्ष देण्याची वेळ आली आहे. निसर्गाचे सर्वांनीच संगोपन करावयास हवे. निसर्ग आपला खरा जीवलग मित्र आहे.
निसर्गाचा प्रकोप होतो तेव्हा :
निसर्ग आणि मानव एक अतूट नातं ! जन्माला आल्यापासून मरेपर्यंत निसर्गच असतो. माणसाचा ‘सखा, सोबती, गुरू… सर्व काही! निसर्गातील मूलभूत तत्त्वांनी, धातुंनी, वायुंनी रसायनशास्त्राचे पान अन् पान सोनेरी केले. भौतिकशास्त्राची जराशी क्लिष्ट नी रुक्ष इमारत निसर्गातील सिद्धांतावरच उभी आहे.
अश्मयुगातील मानव भूगोल, पर्यावरण शिकला तो निसर्गाकडूनच ! मानवाला निसर्गाने ‘दो हातांनी’ भरभरून दिले. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचमहाभूतांनी मानवाला समृद्ध केले. अश्मयुगापासूनच मानव त्यांची पूजा करतो. त्यांना वंदन करतो, कृतज्ञता मानतो. ऋण फेडण्यासाठी निरनिराळे सण साजरे करतो. Essay on Environment in Marathi Language
पण जसजसे दिवस जाऊ लागले, मानव सुधारणा करू लागला, नवनवे शोध लावू लागला. औद्योगिक क्रांती झाली. शेतीविषयक तंत्रज्ञान विकसित झाले. सारी पृथ्वी जणू काही जवळ आली. ‘इको फ्रेंडली’ वातावरण नांदू लागले.
पण हे सारे करताना मानव हळूहळू निसर्गाच्या दूर जाऊ लागला. त्याला वाटले की, त्याने निसर्गावर मात केली. दिवसेंदिवस त्याची हाव वाढतच गेली. त्याने निसर्गाला ओरबाडायला सुरुवात केली. सारीच परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली, तेव्हा निसर्गाने एका-एका घटकाने जणू आपल्या अस्तित्वाच्या खुणा दाखवायला सुरुवात केली.
पृथ्वीवर लोकसंख्येचा विस्फोट झाला. समुद्रावर भरी घालून जमिनी तयार करण्यात आल्या, त्यावर इमारती उभ्या राहू लागल्या. नद्यांच्या पात्रांच्या दिशा हव्या तशा वळवण्यात आल्या, मानवाच्या सुखसोयींसाठी ! मग मात्र निसर्ग खवळला. त्याने ‘त्सुनामी’चे अस्त्र आपल्या भात्यातून काढले. या अजस्र विशालकाय लाटांनी गावेच्या गावे गिळंकृत केली. लाखोंना जलसमाधी दिली. २६ जुलैला झालेला पाऊस व पूर मुंबई नगरीची कशी दाणादाण करून गेला, हे कुणी विसरू शकेल? किल्लारी व भूजच्या भूकंपाच्या उद्धस्त खाणाखु आजही कित्येक अंशी तशाच आहेत.
अमेरिकेसारख्या बलाढ्य देशालाही समुद्राचे सोडले नाही. रिटा, कॅतारिना ह्या समुद्री वादळांनी या देशाला राहुकेतूसारखे ग्रासले सटलीमधील व्हेनिस शहरात समुद्राची जलपातळी उंचावली, ते शहर जलमय होण्याची भीती तर सदा आहेच. वातावरणातील वाढत्या Co, च्या प्रमाणामुळे, सूर्यापासून मिळणारी उष्णता व पृथ्वीपासून उत्सर्जित उष्णता वातावरणातच अडकून राहत आहे व त्यातूनच जन्म घेत आहे… सध्याचा सगळ्यांना भेडसावणारा प्रश्न ग्लोबल वॉर्मिंग ! उत्तर ध्रुवही उच्च तापमानामुळे वितळू पाहातोय. येत्या काही वर्षात मुंबई शहर ही पाण्याखाली जाण्याचा धोका संभवतो.
निसर्ग इतिहासही घडवतो. कोलंबसाने कितीही गर्वाने त्याच्या सैनिकांना लढण्याबद्दल आवाहन केले, तरी त्यांचा लढा आधी नैसर्गिक आपत्तींशी होता. निसर्ग नियमांना तुच्छ लेखणाऱ्या हिटलरसारख्या पाशवी हुकुमशहांची, सैन्याची रशियाच्या थंडीत ससेहोलपट झाली. विज्ञानाच्या शोधांवर मिजास करणाऱ्या मानवावर AIDS सारख्या रोगांपुढे गुडघे टेकायची वेळ आली. क्लोनिंग, टेस्ट ट्यूब बेबी यांसारखे शोध लावू पाहणाऱ्या हृदय शस्त्रक्रिया करून, इंद्रिये रोपणे करून आयुर्मर्यादा वाढवणाऱ्या माणसाला कळलंच नाही की,
Nature loves symmetry! जन्म-मृत्यू, फायदे-तोटे, न्याय- अन्यायाचे पारडे नेहमी तो समतोल ठेवतो. वसुंधरेला डिवचलेलं त्याला आवडत नाही आणि म्हणूनच वैज्ञानिक शोधांना शह देत निसर्ग कधी थंडीची लाट आणून बळी घेतो तर कधी भूकंपाने होत्याचे नव्हते करून माणसे पोटात घेतो. कधी केवळ फुंकर मारून वादळवारे निर्माण करतो, तर कधी वणवे पेटवतो, कधी पूर आणतो. प्रलय आणतो. विजा कोसळवतो, ढगफुटी होऊन पिके उद्ध्वस्त करतो. जनजीवन विस्कळीत करतो. कीटकनाशकांना दाद न देणारे नवे कीटक पैदा होतात. औषधांना दाद न देणारे साथीचे रोग फैलावतात, माणसे दगावतात.
मला वाटतं… निसर्ग पूर, भूकंप, दुष्काळ, अतिवृष्टी यांसारख्या नैसर्गिक आपत्तींद्वारे स्वतःची विनाशलीला दाखवत असतो, पण परत सृष्टीनाशाच्या दुःखाला, निर्माणसुखात परिवर्तित करण्यासाठी नवीन आशा आणि विश्वास यांबरोबर जोमाने निर्मितीच्या कामात मग्न होते. जणू,
‘प्रलय की निस्तब्धता से सृष्टि का नवगान फिर-फिर।’
नीड का निर्माण फिर-फिर, नेह का आह्वान फिर-फिर ।।
‘सृष्टीचे मित्र आम्ही मित्र अंकुराचे, ओठांवर झेलू थेंब पावसाचे ।
अजूनही वेळ गेलेली नाही, त्यामुळे निसर्गाने मानवाला घालून दिलेल्या मर्यादा ओलांडून, निसर्गाशी स्पर्धा करण्यापेक्षा, त्याच्याशी मैत्रीचे नाते स्विकारून, परस्पर संबंध अधिकाधिक दृढ करून, आपले पृथ्वीवरील वास्तव्य व भवितव्य अधिक सुखकारक करूयात.
तर मित्रांनो कसा वाटला हा Essay on Nature in Marathi निबंध आवडला असेल तर जरूर कॉमेंट करा.
खालील निबंध जरूर वाचा.
For More information on essay on Nature In English Click here : Link
Thank You for your valuable time…!