itemtype="https://schema.org/Blog" itemscope>

joymarathi

Essay on Pollution in Marathi / प्रदूषण एक समस्या मराठी निबंध(३०० शब्दात) :-

Essay on Pollution in Marathi

Essay on Pollution in Marathi

निबंध : प्रदूषण एक समस्या

सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने प्रदूषण हाही एक गंभीर प्रश्न आहे. वेगाने वाढणारी लोकसंख्या, रासायनिक उद्योगधंदे आणि त्यामुळे वेगाने वाढणारे प्रदूषण अशा गोष्टींनी आज मानवी जीवनाचा कप्पा दूषित करुन ठेवलाय.

विज्ञान युगाने अनेक सुखसोयी आणल्या, त्याबरोबर कांही संकटेही आणली. विज्ञानयुगाच्या हातात कॅन्सरसारख्या असाध्य गणल्या जाणाऱ्या रोगावरील औषध आहे. दुसऱ्या हातात लाखो लोकांची राखरांगोळी करणारा Atom Bomb आहे. एका डोळ्यात संहाराची दाहकता आहे. दुसऱ्या डोळ्यात संरक्षण मोहकता ओसंडत आहे. बहात्तर मजल्यांच्या इमारती उभारण्याचे अभूतपूर्व सामर्थ्य आजच्या मानवाला आहे. पण त्याच मानवाच्या जगात रात्री डोके ठेवायला निवाऱ्याची जागा नाही. फुटपाथवर असंख्य माणसे विसावतात.

शिक्षणाचा प्रसार आणि जीवनाचा संकोच, अठराविश्व दारिद्रय आणि अठरा कारखाने, वेगाने वाढणारे प्रदूषण आणि त्या वेगाशी स्पर्धा करणारे पशुतुल्य आचरण अशा विलक्षण विरोधी जोड्या मानवी जीवनात हातात हात घालून फिरत आहेत. त्या विचित्र आणि विलक्षण विरोधांनी आजच्या मानवाचे जीवन अधिकच दूषित होत आहे. प्रदूषणाची समस्या देशभर पसरलेली आहे. कारखानी उद्यागधंद्याच्या वाढीमुळे हवेचे प्रदूषण तर प्रत्येकाला श्वासोच्छवास करतेवेळीसुद्धा जाणवत आहे. हवेच्या प्रदूषणापेक्षाही जलप्रदूषण आज मोठ्या प्रमाणात होत आहे. गटारे, कारखाने हे घटक तर कारणीभूत आहेतच पण सांस्कृतिक, धार्मिक रुढी, परंपरा या घटकांनी सुद्धा जल प्रदूषणाला मोठ्या प्रमाणात हातभार लावला आहे, हा परिच्छेद Essay on Pollution in Marathi प्रदूषणाची कारणे दर्शवतो.

मानवाच्या आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छ सूर्यप्रकाश, शुद्ध पाणी, शांत वातावरण या घटकांची जी आवश्यकता असते ते मिळणे आज अशक्य झाले आहे. ध्वनीच्या वेगापेक्षा जास्त वेगवान यंत्रे मानवाने निर्माण केलेली आहेत. वाहनांच्या कर्कश आवाजाने शांतता शब्दाचा अर्थच संपवलाय. हे प्रदूषण मानवी आरोग्यास विघातक आहे. त्याची चिंता सर्वांना आहे. पण या प्रदूषणापेक्षा

मानवतेचे, चारित्र्याचे प्रदूषण महाभयानक आहे. या प्रदूषणाची भीती अधिक वाटते.

चारित्र्य ही फार मोठी शक्ती आहे. भौतिक समृद्धी संस्कृतीचे संवर्धन करु शकत नाही. त्याकरिता चारित्र्याबद्दलची अनास्था संपायला हवी स्वातंत्र्यपूर्वकालात नेते चारित्र्यसंपन्न, ध्येयवादी, प्रांजल, प्रामाणिक व कर्तव्यनिष्ठ होते, आता सत्ता आणि भत्ता ही दोनच मूल्ये सर्व श्रेष्ठ मानली जात आहेत. भारतीय संस्कृतीचे भारतीयत्व हरवलेले आहे. चारित्र्याचे प्रदूषण सर्व पातळीवर होत आहे, हा परिच्छेद Essay on Pollution in Marathi चारित्र्याचे प्रदूषणावर लिहिले आहे.

स्वातंत्र्यपूर्वकाळात स्वदेश, स्वभाषा यांच्या निष्ठा जागृत होत्या. देशासाठी, समाजासाठी, स्वतःचे आयुष्य संकटात झोकून देणारी माणसे त्या कालखंडात भेटत होती. पण अलिकडे विषण्णतेशिवाय काहीही सापडत नाही. आपल्या आजच्या जीवनात कोणती तरी ध्येयनिष्ठा धरून काहीतरी विशिष्ट मूल्ये उराशी कवटाळून त्यासाठी हट्ट धरून बसण्याची प्रवृत्तीच कमी झाली आहे. सुकाणू हरवलेल्या नौकेने कोठेही भरकटत जावे अशी मानवाच्या जीवनाची दिशाहीन अवस्था आहे.

जीवनाच्या कोणत्याच क्षेत्रात ध्येयनिष्ठा उरलेली नाही. व्यासंगाची जिद्द नाही. छचोर चित्रपट, भडक मासिके, दररोज बदलणारे शिक्षणाचे आकृतिबंध यांनी मानवी मते दूषित झालेली आहेत. या परिस्थितीचे परिणाम विद्यार्थ्यांवर होणारच. ते कोण थांबवू शकणार नाही. वैयक्तिक व सामाजिक नीतीमत्ता आज औषधालाही उरलेली नाही. जीवनाचे एकही अंग प्रदूषणाशिवाय उरलेले नाही, ‘देश म्हणजे देशातील दगडधोंडे नव्हेत. देश म्हणजे देशातील माणसे’ या माणसाच्या मनात सत्वशीलतेचे संस्कार कसे रुजवता येतील याचा विचार करणे अत्यंत गरजेचे आहे.ह्या परिच्छेद Essay on Pollution in Marathi माणुसकीचे प्रदूषण लिहिले आहे.

समाजप्रबोधनाची जी माध्यमे आहेत रेडिओ, वृत्तपत्रे मासिके या सगळ्यांनी समाज मनावर कांही चांगले संस्कार घडतील याची उपाययोजना केली पाहीजे. संस्कार संवर्धनाचे काम व्हायला हवे. लहान मुले ज्या घरात, ज्या शाळेत शिकतात तिथपासूनच या संस्कार क्षमतेच्या जडण घडणीला प्रारंभ केला पाहिजे.

शिक्षण म्हणजे राजकारणाचे अड्डे, निष्क्रीय तरुणांची पलटण तयार करणारे कारखाने झालेत. यापेक्षा संस्कारयुक्त शिक्षणाची कास धरण्याची गरज आहे. ज्ञानाला जर सुसंस्कारांची जोड मिळाली नाही तर ते ज्ञान अमृत बनण्यापेक्षा विष ठरत असते. म्हणून मानवतेचे प्रदूषण थांबवायचे असेल तर संस्कारांची आज फार मोठी गरज आहे, पण हे लक्षात कोण घेतो ? ह्या परिच्छेद Essay on Pollution in Marathi मानवतेचे प्रदूषण लिहिले आहे.

I Love not the less but nature more’ वर्डस्बर्थ या आंग्ल कवीचे उद्‌गार अगदीच सार्थ आहेत. निवृत्ती अथवा प्रवृत्ती जपणारा कोणीही माणूस निसर्गापासून दूर राहू शकत नाही. कारण निसर्गाने निर्माण केलेल्या प्राणी सृष्टीपैकीच तो एक घटक आहे. पण एक गोष्ट खरी की सृष्टीतील इतर प्राणी सृष्टीचा विचार केला तर मानव हा शारीरिक बळाच्या बाबतीत फारच दुबळा आहे. त्याच्याकडे हत्तीचे बळ नाही, सिंहाच्या गर्जनेतील सामर्थ्य नाही किंवा हिंस्त्रपशुच्या तुलनेने तो स्वतःचे संरक्षण करायलाही असमर्थ आहे. पण इतर प्राणी आणि मानव यांच्यात एकमोठा फरक आहे. तो म्हणजे मानवाला लाभलेली बुद्धी. माणूस हा बुद्धीवादी प्राणी आहे. तो त्याच्या बुद्धीसामर्थ्याच्या जोरावर इतर प्राण्यांपेक्षा श्रेष्ठ बनलाय.

विज्ञानाला त्याने आपलेसे करून घेतल्यामुळे तो निसर्गावरही मात करण्याचे मनसुबे रचायला लागलेला आहे. आणि या त्याच्या धडपडीमुळे त्याने काही समस्या निर्माण केलेल्या आहेत. त्या अनेक समस्यापैकी मानवालाच खाऊन टाकायला उठलेली समस्या म्हणजे प्रदूषण.

या प्रदूषणामुळे मानवाला आरोग्यसंपन्न व सुखी जीवन जगता येणे दिवसेंदिवस कठीण व्हायला लागलय. आद्योगिक शहरांची संख्या वाढत चालली. खेड्यातील लोकांचे लोंढेच्या लोंढे शहराकडे उद्योगाच्या शोधार्थ निघाले. मनुष्य बळाच्या रेट्यामुळे कारखाने वाढत चालले. कारखाने Carbon Dioxide, Carbon Monoxide, धुलीकण यासारखे मनुष्य जीवनाला विषारी वायू निर्माण होताहेत. त्यामुळे असाध्य रोग निर्माण होताहेत. काही वेळा धुके पडत असते. फुप्फुसाचा कर्करोग फैलावत चालेला आहे. असे शास्त्रज्ञांचे अनुमान आहे. त्याबरोबरच कारखाना परिसरातील पिके प्रदूषणामुळे नष्ट होताना दिसताहेत, ह्या परिच्छेद Essay on Pollution in Marathi वायू प्रदुषणावर लिहिले आहे.

प्रदूषणाचे आणखी एक महत्त्वाचे अरिष्ट म्हणजे भयानक जंगलतोड. या जंगल तोडीमुळे प्राणवायू व Carbon Dioxide यांचा समतोल राखायला लागलाय. त्यामुळे हवेचे प्रदूषण वाढतय. हवा कोंदट व कुबट होतेय आणि त्यामुळे अनेक प्रकारचे रोग फैलावताना दिसतात.

हवेप्रमाणे पाण्याचेही प्रदूषण मोठ्या प्रमाणात होताना दिसतेय. शहरातील गटारांचे एकत्रित पाणी नद्यांमध्ये सोडले जाते. हे पाणी प्रदूषीत असते. त्यामुळे नद्यांचेही पाणी दूषीत होताना दिसतेय, जंतुंचे उत्पादनही मोठ्या प्रमाणावर होते. Colara हा रोग फेलावतो. नद्यांच्या पाण्यामध्ये मिसळणाऱ्या मलमुत्रामुळे विषमज्वर, अमांश हे रोग उद्घतात. त्यामुळे अनेक नाहक बळी पडतात. समुद्रात निरूपयोगी खनिज तेले सोडली जातात. त्यामुळे पाण्यावर तवंग येतो. त्यामुळे जलचर प्राण्यांना प्राणवायू मिळत नाही. त्यामुळे निष्प्राण होणारी सागरसंपत्ती समुद्राच्या पाण्यावर तरंगताना दिसते, ह्या परिच्छेद Essay on Pollution in Marathi पाणी प्रदुषणावर लिहिले आहे.

हवा आणि पाणी याप्रमाणे अलिकडे अन्नाचे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होताना आढळते. शिवारात पिके उभी असताना वनस्पतीवर पडणारे अनेक रोग पिकांवर पडतात. त्या रोग नियंत्रणासाठी विविध प्रकारच्या किटकनाशकांची फवारणी केली जाते. तेच अन्न खाण्यात आल्यामुळे प्राण्याला ईजा पोहोचते. शेतातील उंदीर नष्ट करण्यासाठी शेतात ठेवलेली औषधेही आपणांस मारक ठरतात.

रासायनिक खतांच्या अतिरेकी वापरामुळे जमिनीला मीठ फुटते. मीठ फुटल्यामुळे जमिनी नापीक होतात. साधी झुडपेही येथे जीव धरू शकत नाहीत. लाखाच्या घरात उत्पन्न देणाऱ्या जमिनी निकामी होतात, ह्या परिच्छेद Essay on Pollution in Marathi जमीन प्रदुषणावर लिहिले आहे.
प्रदूषणामुळे निसर्गाचा समतोल ढळतो, बिघडतो. पृथ्वीच्या पाठीवरील नैसर्गिक जीवन बिघडले जाते. शुद्ध हवा, पाणी, अन्न या सर्वाना माणूस महाग होतोय. त्यामुळे नेहमीच्या जीवनातून Relax मिळण्यासाठी तो निसर्गाकडे धावतो. पण निसर्ग त्याच्या सान्निध्यात असतोच कोठे ? आणि त्याचे विध्वंसन मानवानेच केलेले असते. ते विध्वंसन थांबले पाहिजे. वृक्षारोपणामुळे काही प्रमाणात हा समतोल सावरता येईल.

मानवाने विज्ञानाच्या हव्यासामुळे व त्याच्या अतिरेकी गैरवापरामुळे प्रदूषण वाढलेले असून त्यांचे जीवन धोक्यात येताना दिसतेय. तो धोका टाळण्यासाठी जीवन सुखी व समृद्ध करण्यासाठी प्रदूषण हटविण्याचे सर्वव्यापी प्रयत्न झाले पाहिजेत.

निबंध : प्रदूषण एक समस्या

पर्यावरणीय प्रदूषणाचा सामना करण्यासाठी शमन आणि उपाय:-

आपण खालील उपाययोजना करून पर्यावरणीय प्रदूषणाचा सामना करू शकतो. सार्वजनिक आरोग्य आणि पर्यावरणाच्या जास्तीत जास्त संरक्षणासह पर्यावरणातील भौतिक, रासायनिक आणि जैविक अखंडतेचे रक्षण करा.

नैसर्गिक संसाधने आणि लँडफिल स्पेसचे संरक्षण करण्यासाठी तीन ‘R’ (कमी, पुनर्वापर आणि रीसायल) अनुसरण करा.

तुमच्या समुदायातील स्वच्छतेसाठी स्वयंसेवक. एखाद्याच्या पाणलोटाचे रक्षण करण्यातही सहभागी होऊ शकतो.

एखादी व्यक्ती इतरांना आपल्या नैसर्गिक संसाधनांचे महत्त्व आणि मूल्य समजण्यास मदत करू शकते,

ऊर्जा कार्यक्षम दिव्यांचा वापर हरितगृह वायू उत्सर्जन कमी करू शकतो.

• ऊर्जा वाढीचा दर कमी करणाऱ्या, ऊर्जा संवर्धनावर भर देणाऱ्या आणि नवीकरणीय संसाधनांच्या वापरास प्रोत्साहन देणाऱ्या पर्यावरणास अनुकूल धोरणांचे समर्थन करा. पृष्ठभागावरील पाण्याचे संरक्षण करण्यासाठी प्रदूषण कमी करण्यासाठी उपायांचे समर्थन करणे.

भूजल आणि पिण्याचे पाणी. निर्मिती कमी करण्यासाठी धोरणांना प्रोत्साहन द्या आणि घन आणि घातक कचऱ्याच्या पुनर्वापर आणि पुनर्वापराला प्रोत्साहन द्या.

• जलमार्गांमध्ये रसायने सोडू नका आणि घर आणि सार्वजनिक ठिकाणी बिनविषारी रसायने निवडा.

कमी प्लास्टिक खरेदी करा आणि पुन्हा वापरता येणारी Shopping Bag आणा

निष्कर्ष / Essay on Pollution in Marathi :-

आपण निसर्गावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहोत हे मानव अनेकदा विसरतो आणि त्याची काळजी घेण्याकडे दुर्लक्ष करतो. एखाद्याच्या कृतीचा पृथ्वीच्या स्थिरतेवर परिणाम होऊ शकतो हे पाहावे लागेल. व्यक्तींनी मोठ्या प्रमाणावर घेतलेले निर्णय आणि कृती प्रत्येकाच्या जीवनाचा दर्जा ठरवतात. हे आवश्यक आहे की व्यक्तींनी केवळ विविध पर्यावरणीय समस्यांबद्दल आणि पर्यावरणावरील त्यांच्या कृतींच्या परिणामांबद्दल जागरूक असले पाहिजे असे नाही तर पर्यावरणीय नैतिक जीवनशैली विकसित करण्यासाठी ठोस उपाय देखील केला पाहिजे.

तर मित्रांनो कसा वाटला Essay on Pollution in Marathi निबंध आवडला असेल तर जरूर कॉमेंट करा.

खालील निबंध जरूर वाचा.

For More information on essay on Pollution in english Click here : Link

Thank You for your valuable time…!

3 thoughts on “Essay on Pollution in Marathi / प्रदूषण एक समस्या मराठी निबंध(३०० शब्दात) :-”

Leave a Comment