itemtype="https://schema.org/Blog" itemscope>

joymarathi

Maza avadta sant essay in marathi/माझा आवडता संत : संत तुकाराम(३०० शब्दात) :-

Maza avadta sant essay in marathi

माझा आवडता संत : संत तुकाराम

संत तुकाराम हे इ.स.च्या सतराव्या शतकातील एक वारकरी संत – कवी होते. त्यांचा जन्म देहु या गावात वसंत पंचमीला-माघ शुद्ध पंचमीला झाला. पंढरपूरचा विठोबा हे तुकारामांचे आराध्यदैवत होते. तुकारामांना वारकरी ‘जगद्‌गुरू’ म्हणून ओळखतात. वारकरी संप्रदायातल्या प्रवचन व कीर्तनाच्या शेवटी – ‘पुंडलीक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, जगद्गुरू तुकाराम महाराज की जय’ असा जयघोष करतात. जगद्गुरू तुकाराम लोककवी होते. ‘जे का रंजले गांजले! त्यासी म्हणे जो आपुले तोचि साधू ओळखावा! देव तेथेची जाणावा!’ अशा प्रकारचे अभंग संत तुकाराम महाराजांनी जनसामान्यांना सांगून ईश्वर भक्तीचा सुगम मार्ग दाखवला. वारकरी संप्रदायाची अखंड परंपरा त्यांनी निर्माण केली.

सतराव्या शतकामध्ये सामाजिक प्रबोधनाचे मुहूर्तमेढ रोवणारे सुधारक संत म्हणून तुकाराम महाराजांचा उल्लेख केला जातो. तुकाराम महाराज वास्तववादी निर्भीड आणि वेळप्रसंगी समाजातील दांभिकपणावर रोखठोक शब्दांमध्ये प्रहार करणारे संत होते. महाराष्ट्राच्या भूमीमध्ये या काळात अनागोंदी निर्माण झालेली होती. अशा काळात संत तुकारामांनी आपल्या साहित्यातून व कीर्तनांतून समाजाला अचूक मार्गदर्शन करण्याचे कार्य केले.

संत तुकारामांचे जीवन

तुकारामांच्या जन्मवर्षाबद्दल इतिहासकारांमध्ये मतभेद आहेत, त्यातली चार संभाव्य वर्षे इ.स. १५६८, इ.स. १५७७, इ.स. १६०८ आणि इ.स. १५९८ ही आहेत. इ.स. १६५० मध्ये हजर असलेल्या तमाम जनतेच्या समक्ष त्यांचा देव, विठ्ठल त्यांना सदेह वैकुंठी घेऊन गेले असे मानले जाते. पण याबद्दल पुरोगामी आणि अतिसुशिक्षित लोकांना साशंकता आहे.

तुकाराम महाराज वाणी समाजाचे; त्यांचे घराणे मोरे आणि आडनाव अंबिले आहे. त्यांच्या घराण्यातील विश्वंभरबुवा हे मूळ पुरुष महान विठ्ठलभक्त होते. त्यांच्या घरात पंढरीची वारी करण्याची परंपरा होती. तुकारामांचे वडील बोल्होबा व आई कनकाई होत. त्यांना सावजी हा मोठा भाऊ व कान्होबा धाकटा भाऊ होता. मोठा भाऊ सावजी विरक्त वृत्तीचा होता. घराची संपूर्ण जबाबदारी तुकोबांवरच होती. पुण्याचे आप्पाजी गुळवे यांची कन्या जिजाई (आवली) हिच्याशी त्यांचा द्वितीय विवाह झाला होता.

तुकोबांना त्यांच्या प्रापंचिक जीवनात विपत्तींचे तडाखे सहन करावे लागले. अनेक प्रापंचिक दुःखे भोगावी लागली. ते १७-१८ वर्षांचे असताना त्यांचे आई-वडील मरण पावले, मोठा भाऊ विरक्तीमुळे तीर्थाटनाला निघून गेला. भयंकर दुष्काळाचा त्यांना सामना करावा लागला. संतू नावाचा त्यांचा मोठा मुलगा दुष्काळातच गेला, गुरे ढोरेही गेली, महाजनकी बुडाली.

मन उदास झाले, संसारात विरक्ती आली. या परिस्थितीत त्यांनी श्रीविठ्ठलावरची आपली परमभक्ती कायम ठेवत देहू गावाजवळील भंडारा डोंगरावर उपासना चालू केली. चिरंतनाचा, शाश्वताचा शोध घेत असताना त्यांना साक्षात्कार झाला. तेथेच परब्रह्मस्वरूप ‘श्रीविठ्ठल’ त्यांना भेटला असे मानले जाते. वरील परिच्छेद हा Maza avadta sant essay in marathi तुकारामांचे जीवनाचे वर्णन केले आहे.

Maza avadta sant essay in marathi वरील निबंध ३०० शब्दांचा आहे अधिक माहितीसाठी खालील माहितीं वाचा.

कौटुंबिक व्यवसाय
तुकारामांनी 1621 मध्ये वयाच्या 13 व्या वर्षी व्यवसायात प्रवेश केला, जेव्हा त्यांचा मोठा भाऊ सावजी यांनी त्यांना अध्यात्मिक जगामध्ये अधिक रस असल्याने असमर्थता व्यक्त केली.

कुटुंबातील इतर सदस्यांप्रमाणे, त्यांनी व्यवसायाला हुक किंवा कुटील पैसे कमविण्याचे साधन मानले नाही. किंबहुना, तुकारामांनी हा व्यवसाय सर्वोदय उपक्रमासारखा चालवला, जिथे खरेदीदार त्याला हवे ते घेऊ शकत होता, कधी कधी त्याची किंमत न देताही!

तुकाराम म्हणतात की त्यांनी व्यापाऱ्याच्या व्यवसायाचे पालन केल्याने तो वैश्य असल्याचा आभास निर्माण होऊ शकतो. असे नाही. जन्माविषयी ते पुढे म्हणतात की ते घराणे शुद्ध आहे आणि तो देश पवित्र आहे जिथे हरीचे सेवक जन्माला येतात.
त्यांच्या एका रचनेत तुकाराम म्हणतात.

नीच आणि उदात्त यांच्यात, देवाला काही फरक नाही.
तरीही विश्वासू लोकांना तो त्याचे सर्व वैभव दाखवतो.

काही वर्षे व्यवसायात भरभराट झाली, त्यानंतर संकटे आली. त्यानंतरही त्यांनी आपला प्रामाणिक मार्ग सोडला नाही. त्यांची हरीवरची श्रद्धा नेहमीप्रमाणेच अढळ होती. तो इतर उद्योगपती आणि चांगल्या अर्थाच्या मित्रांच्या टोमणा मारून हसला: “बघा तुझ्या हरीने काय केले आहे. हरिवर अतिविश्वास ठेवल्याने असेच घडते.” त्याने हाती घेतलेल्या प्रत्येक गोष्टीत त्याला अपयश आले. त्यांच्या टोमणे मारूनही इतरांना तुकारामांच्या चांगुलपणाची खात्री पटली आणि त्यांना पैशाची मदत केली. परंतु नवीन उपक्रम मागील उपक्रमांपेक्षा चांगले नाहीत. कुटुंब अत्यंत संकटात सापडले.

वरील परीछेत हा Maza avadta sant essay in marathi तुकारामांचा कौटुंबिक व्यवसाय काय होता ते लिहिले आहे.

तुकारामांच्या दुःखाचा कालक्रम खालीलप्रमाणे आहे. –

तुकारामांच्या आईवडिलांचा १६२५ मध्ये मृत्यू झाला आणि मोठा भाऊ सावजी संन्यासी झाला; 1629 मध्ये त्याचा व्यवसाय अयशस्वी झाला; 1630 मध्ये आलेल्या सर्वात भीषण दुष्काळात त्याची मोठी पत्नी रुखमा आपल्या मोठ्या मुलासह उपासमारीने मरण पावली. या संतांच्या जीवनातील महत्त्वाच्या खुणा होत्या, त्यांचा त्यांच्या आध्यात्मिक जीवनावर कोणत्याही प्रकारे परिणाम झाला नाही. काहीही असले तरी, या शोकांतिकांमुळे त्यांचा पांडुरंगावरील विश्वास दृढ झाला.

संत तुकाराम

सुदुंबरे गावातील त्यांचा बालपणीचा मित्र संताजी जगनाडे यांनी तुकारामांचे अभंग कागदावर उतरवून घेण्याचे काम केले.
देहू गावातीला मंबाजी नामक बुवाने तुकारामांना खूप त्रास दिला. परंतु तुकारामांच्या पत्नी आवलीने मंबाजींना बदडण्याचा प्रयत्न केल्यावर मंबाजी पळून गेला. पण नंतर तुकारामांचा आध्यात्मिक अधिकार ओळखून त्यानेही त्यांचे शिष्यत्व पत्करले.

पुण्याजवळील वाघोली गावातील रामेश्वर भट यांनी तुकारामांना संस्कृत भाषेतील वेदांचा अर्थ प्राकृत भाषेत सांगितल्यावरून त्यांना त्यांच्या अभंगांच्या गाथा इंद्रायणी नदीत बुडवून टाकण्याची शिक्षा दिली. फाल्गुन वद्य द्वितीयेला तुकारामांचे सदेह वैकुंठ-गमन झाले, असे मानले जाते. हा दिवस ‘तुकाराम बीज’ म्हणून ओळखला जातो. तुकाराम महाराज हे संसारी असून सुद्धा त्यांनी आयुष्य परमार्थाकडे वळवले. सर्व समाज श्रीमंत असावा अशी त्यांची धारणा होती.

गरिबांविषयी त्यांना कळवळा होता. त्यांचे अंतकरण महासागरासारखे होते माणुसकीची त्यांना जाणीव होती. ते व्यापारी होते. त्यांनी स्वतःच्या वाट्याला जे आले ते त्यांनी लोकांना दिले. कर्जदारांची कर्ज माफ करणारा हा जगातील पहिला संत होय. जगामध्ये समता नांदावी अशी त्यांची मनोभूमिका होती. संसारातील विरक्तीचा ते महामेरू होते. महात्मा गौतम बुद्धाने जसे राजऐश्वर्याचा त्याग केला. तसा Maza avadta sant essay in marathi संत तुकाराम यांनी संसारातील सुखदुःखाचा त्याग केला. जगाचा संसार सुरळीत चालविण्यासाठी त्यांनी अभंगांद्वारे मानवाला व एकूणच तत्कालीन समाजाला मार्गदर्शन केले. त्यांचे मार्गदर्शन समाजाच्या दृष्टीने मौलिक ठरले.

समाजातील काही विकृत विकारांच्या लोकांनी संत तुकारामांना वेडा ठरविण्याचा प्रयत्न केला. अनेक कट कारस्थाने रचली, त्यांतून तुकाराम सहीसलामत सुटले.

संत तुकारामांना चार मुले होती. कन्या भागीरथी व काशी तर मुलगे नारायण आणि महादेव. यापैकी दोन आजाराने मरण पावले. पहिली बायको गेल्यानंतर त्यांनी पुण्यातील आप्पाजी गुळवे यांची कन्या नवलाई ऊर्फ जिजाऊ हिच्याबरोबर त्यांनी दुसरा विवाह केला. ती स्वभावाने खाष्ट होती परंतु सती सावित्रीसारखी पतिव्रता होती. Maza avadta sant essay in marathi संत तुकारामांचा संसार तिने नीट सांभाळला, त्यांची विरक्ती सांभाळली. संत तुकाराम महाराज भंडारा डोंगरावर आत्मचिंतनासाठी तेरा दिवस बसले. ईश्वराची करुणा भाकत चिंतन केले, त्यावेळी त्यांची सर्व देखभाल जिजाऊने केली.ह्या परिच्छेदात Maza avadta sant essay in marathi तुकारामांचे परिवार कसा होता ते लिहिले आहे.

संत तुकारामांनी स्वतःचा संसार सुखाचा करण्यापेक्षा जगाच्या कल्याणासाठी कीर्तनातून अभंगवाणी रचली, लौकिकार्थाने मायाजालात गुंतले नाहीत. देहूला संत तुकाराम महाराज जेथून वैकुंठाला गेले, त्या स्थानावर नांदुरकीचे एक झाड आहे. तुकाराम बिजेला बरोबर दुपारी १२:०२ वाजता तुकाराम वैकुंठाला गेले, त्या वेळी हा नांदुरकीचा वृक्ष प्रत्यक्ष हलतो, असे सांगितले जाते. संत तुकाराम महाराज हे देहू या गावी जन्मले.

संत तुकाराम महाराजांना “जगदगुरू” असे संबोधले जाते. जगदगुरू तुकाराम महाराज हे सदैव “हरिनामात” गढलेले असायचे. होळी नंतर लगेच दुसऱ्या दिवशी “तुकाराम बीज” हा दिवस येतो. याच दिवशी जगदगुरू तुकाराम महाराज हे नांदुरकी वृक्षाच्या छायेखाली ध्यानस्त बसून सदेह वैकुंठधामाला गेले. वैकुंठधाम म्हणजे साक्षात “श्री हरि भगवान विष्णू” यांचे धाम. जगदगुरू तुकाराम महाराज यांच्या नावातच “राम” आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारख्या एक युगप्रर्वतक महापुरुषाने तुकाराम महाराज यांचे आशीर्वाद घेऊन आपल्या कार्याला सुरुवात केली होती. यामुळे तुकाराम महाराजांना “जगदगुरू” असे संबोधले जाते.

Maza avadta sant essay in marathi : संत तुकाराम ओव्या

कर कटावरी तुळसीच्या माळा । ऐसें रूप डोळां दावीं हरी ॥१॥

ठेविले चरण दोन्ही विटेवरी । ऐसें रूप हरी दावीं डोळां ॥ध्रु.॥

कटीं पीतांबर कास मिरवली । दाखवीं वहिली ऐसी मूर्ती ॥२॥

गरुडपारावरी उभा राहिलासी । आठवें मानसीं तें चि रूप ॥३॥

झुरोनी पांजरा होऊं पाहें आतां । येईं पंढरीनाथा भेटावया ॥४॥

तुका म्हणे माझी पुरवावी आस । विनंती उदास करूं नये ॥५॥

तुकाराम महाराज हे साक्षात्कारी व निर्भीड संत कवी होते. वेदान्त तुकोबांच्या अभंगवाणीतून सामान्य जनांपर्यंत प्रवाहित झाला. ‘अभंग म्हटला की तो फक्त तुकारामाचाच’ एवढी लोकप्रियता त्यांच्या अभंगांना मिळाली. संत तुकारामांची भावकविता म्हणजे अभंग, हे अभंग महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे महान द्योतक आहेत. वारकरी, ईश्र्वरभक्त, साहित्यिक, अभ्यासक व सामान्य रसिक आजही त्यांच्या अभंगांचा अभ्यास करतात. त्यांचे अभंग खेड्यांतील अशिक्षित लोकांच्याही नित्य पाठांत आहेत.

भागवत धर्माचा कळस होण्याचे महद्‌भाग्य त्यांना लाभले. महाराष्ट्राच्या हृदयात अभंगरूपाने ते स्थिरावले आहेत. त्यांच्या अभंगांत परतत्त्वाचा स्पर्श आहे. मंत्रांचे पावित्र्य शब्दकळेत पाझरते. त्यांची प्रत्यक्षानुभूती त्यांच्या भावकाव्यात आहे. त्यांच्या काव्यातील गोडवा व भाषेची रसाळता अतुलनीय आहे. Maza avadta sant essay in marathi संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगलेखनाबरोबरच गवळणीही रचल्या आहेत.

तुकाराम महाराजांचे नाव दिलेली ठिकाणे :-

  • तुकाराम उद्यान (निगडी-पुणे)
  • तुकारामनगर (खराडी-पुणे)
  • तुकारामनगर (तळेगाव दाभाडे-पुणे)
  • तुकारामनगर (पिंपरी-पुणे)
  • तुकारामवाडी (जळगांव)
  • तुकारामवाडी (डोंबिवली पूर्व)
  • तुकारामवाडी (पेण-कोंकण)
  • संत तुकाराम कॅन्सर हॉस्पिटल (संत तुकाराम चौक अकोला)

तर मित्रांनो कसा वाटला Maza avadta sant essay in marathi निबंध आवडला असेल तर जरूर कॉमेंट करा.

खालील निबंध जरूर वाचा.

For More information on essay on Sant Tukaram in English Click here : Link

Leave a Comment