निबंध : माझी शाळा
My school essay in marathi
My school essay in marathi : – बालपणी माझ्या आईचे बोट धरून शाळेत गेली, शाळेत पाऊल पहिले पडले आनंद झाला, उत्सुकता वाढली, माझ्या शाळेचे नाव ‘____ विद्यालय’ आहे. याच शाळेत माझ्या जीवनाला आकार मिळत आहे.
शाळा म्हणजे गंमत, शाळा म्हणजे मस्ती, दंगा, लाडके दोस्त! अशी तेष्ट माझी शाळेबद्दल भावना होती. इथेच मला पहिल्यांदा वर्णमालेची, अर्थात मातृभाषेची खरी ओळख झाली. मी डब्यातली भाजीपोळी चाटूनपुसून खाऊ लागलो. निरनिराळे खेळ खेळू लागलो. भांडणं झाली, रडारडी झाली… तरी शाळेतून घरी जाताना, हसतमुखच परतायचं असतं, हेही शिकलो!
शाळेची इमारत दगडी आहे. इमारत भव्य आहे. आजूबाजूला भरपूर दाट हिरवीगार फुलझाडे, फळझाडे आहेत. खेळायला मोठे मैदान आहे. प्रार्थना हॉल आहे. भरपूर विविध विषयांची पुस्तकांनी भरलेली सुसज्ज मोडे ग्रंथालय आहे. मुख्याध्यापक व शिक्षक मायाळू आहे. आईच्या मायेने शिकवितात. चांगले समजावून सांगतात. कठिण भाग सोपा करून शिकवितात. वर्गात मोठमोठे फळे आहेत. फळ्यावर सुवाच्च अक्षरात शिक्षक लिहितात. आकृत्या चित्र सुंदर काढतात. वर्गात तक्ते लावलेले आहेत. विशेष कार्यक्रमाला मोठमोठे वक्ते बोलावतात. वैचारिक माहिती मिळते. १५ ऑगस्ट, २६ जानेवारीला झेंडावंदन होते. भव्य सांस्कृतिक कार्यक्रम होतो. मुलांना कपडे, खाऊ वाटला जातो. बक्षीस दिले जाते.
आमच्या शाळेत शिस्तीचे महत्व फार आहे, शाळेची पहिली घंटा होते तेव्हा सर्व मुले शाळेच्या फाटकाच्या आत आलेली असली पाहिजेत, दुसरी घंटा होते तेव्हा आपापल्या वर्गात गेली पाहिजेत आणि तिस-या घंटेला प्रार्थना सुरू झाली पाहिजे असा आमच्या मुख्यराध्यापकांचा आग्रह असतो.
आमचे सर्व शिक्षक खूप मनमिळाऊ असून वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भागघेण्यास ते आम्हाला खूप प्रोत्साहन देतात. आमच्यासाठी खास खोखोचे प्रशिक्षणसुद्धाशाळेत चालते. मी स्वतः खोखोच्या संघात असून गेल्या वर्षी आम्हाला आंतरशालिय ढाल मिळाली होती. त्याशिवाय उन्हाळी सुट्टीत आमच्यासाठी पोहण्याची खासशिबिरे आयोजित केली जातात, आमच्या लहानमोठ्या सहली काढल्या जातात. मी दर वर्षी शाळेच्या सहलीला जातो. आईबाबांसोबत सहलीला जाणे, आणि बरोबरीच्या मित्रांसोबत शाळेच्या सहलीला जाणे ह्यात खूप फरक आहे. मात्र शाळेच्या सहलीत फार मस्ती करून चालत नाही. मुले एकदा चेकाळली की कुणाचेच ऐकत नाहीत असा आमच्या सरांचा अनुभव आहे. ह्या शाळेत मी आहे हे माझे मोठे भाग्य आहे असे मला वाटते कारण इथेच मला खुप चांगले मित्र मिळाले.
माझ्या शाळेचे वैशिष्टय, मोठ्ठी प्रयोगशाळा, संगणक कक्ष, वाचनालय हे आहे. याद्वारे विद्यार्थ्यांचा विकास घडून येण्यास मदत होते. शाळेत वक्तृत्व स्पर्धा, लेखनस्पर्धा होतात. त्यात मी भाग घेतो. मला कबड्डी हा खेळ फारचं आवडतो. आंतरशालेय स्पर्धेत मी प्रथम आलो होतो. मी ८ वीच्या वर्गाचा वर्गप्रमुख आहे. निबंध वह्या, प्रयोग वह्या, अद्यायावत ठेवतो. शिक्षकांजवळ गोळा करून देतो. माझा वर्ग हवेशीर आहे. शाळाच अती सुंदर आहे. भरपूर हवा, उजेड स्वच्छता शिस्त, उत्तम दर्जेदार शिक्षण मेहनती शिक्षक यामुळेच मला माझी शाळा फार फार आवडते शाळेमधून मी उंच भरारी घेतो आहे. वर्गमित्रही खूप आहेत. सर्व एकमेकांना मदत करतो. शाळेचे नांव मोठे करण्यात मदत होते. माझी शाळा खूप आवडते. ह्या परिच्छेदात My school essay in marathi आपण शाळेतील विविध शिकण्याच्या गोष्टी मिळतात त्याबद्दल पाहिले.
माझ्या शाळेतील वर्ग खोल्या ऐसपैस आणि हवेशीर आहेत. येथील वर्ग संगणक, प्रोजेक्टर व इतर आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहेत. आम्ही काढलेली चित्रे, सुंदर अक्षरात लिहिलेले सुविचार, कार्यानुभवात तयार केलेल्या सुंदर वस्तू, थोर व्यक्ती, शास्त्रज्ञ, लेखक अशांचे फोटो इत्यादींनी शाळेचे वर्ग सजवले आहेत. शाळेत विविध पुस्तकांनी सजलेले वाचनालय म्हणजे आमच्यासाठी ज्ञानाचा खजिना आहे. विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळी प्रसाधनगृहे, पिण्याचे शुद्ध पाणी यांची चांगली सोय आहे. आमच्या शाळेत संगणकाची, विज्ञानाची, भाषेची, भूगोलाची प्रयोगशाळा आहे, आमच्या शाळेची एक बाग आहे. तिथे आम्ही भाज्या, फळे आणि फुले वाढवतो. बागेच्या एका कोपऱ्यात आम्ही काही कोंबड्या, २ शेळ्या आणि २ गायी पाळल्या आहेत. याला आम्ही गमतीने शाळेचे फॉर्म हाऊस असे म्हणतो.
वरील निबंध My school essay in marathi – 400 शब्दांचा आहे अधिक माहितीसाठी खालील माहितीं वाचा.
निबंध : माझी शाळा
My school essay in marathi : – माझ्या शाळेने माझी कौशल्ये व क्षमता यांच्या विकासाची सतत संधी दिली, विविध ज्ञान दिले, आम्हाला विविध शैक्षणिक अनुभव दिले, आमच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केलेत, एक चांगला नागरिक म्हणून आमच्या जीवनाचा पाया मजबूत केला. सत्य, शिव आणि सुंदर असलेल्या माझ्या या शाळेला मी मनापासून नमस्कार करतो.
माझ्या शाळेचा गणवेश खूपच सुंदर आहे. मला तो खूपच आवडते.आम्हा प्रत्येक विद्यार्थ्यांना शाळेकडून आय कार्ड दिले आहे ज्यात आमची प्राथमिक माहिती लिहिली आहे. आय कार्ड देण्यामागचे कारण असे की, जर का शाळेतून जाताना किंवा येताना कोणतीही दुर्घटना घडली तर त्या आय कार्डच्या माध्यमातून संपर्क साधता यावा. आमच्याकडे आमच्या शाळेची बस आहे जी आम्हाला घरातून शाळेत आणते आणि शाळेतून घराकडे परत घेऊन जाते. मी माझ्या मित्रांनसोबत बस मध्ये खूप मज्जा करतो.
शाळेचा परिसर हा खूप निसर्गरम्य आहे.आमच्या शाळेच्या भिंतींवर खूप छान रंगरंगोटी केलेली आहे. त्यावर प्राणी, पक्षांची सुंदर चित्रे आहेत. तसेच भिंतीवर गणिताचे पाढे, मराठी बाराखडी यांचे चार्ट आहे. काही भिंतीवर राष्ट्रगीत, वंदेमातरम्, संविधान देखील लिहिले आहे. आम्ही ते चालत बोलत वाचतो. तसेच माझ्या शाळेचे मैदान खूप मोठे आहे. मी आणि माझे मित्र तेथे धमाल मस्ती करत असतो. याच मैदानात मधल्या सुट्टीत व खेळाच्या तासाला आमच्या आवडीचे खेळ खेळतो.ह्या मध्ये My school essay in marathi आपण शाळेचा परिसर याबद्दल लिहिले.
आमच्या शाळेमध्ये शैक्षणिक शिक्षणासोबत सह अभ्यासक्रमावर ही भर दिला जातो. राजकारणामुळे आमच्या शाळेने विविध क्लब आणि अंगणाची सुरुवात केली आहे आपला व संघटनांचा हेतू विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात मदत करणे आहे.शाळेत विविध क्लब आहेत जसे विज्ञान क्लब, वादविवाद क्लब ,कला क्लब, पर्यावरण क्लब,सामाजिक सेवा क्लब इत्यादी.विज्ञान क्लब मध्ये विविध वैज्ञानिक प्रयोग प्रदर्शन व शैक्षणिक सहलीच्या आयोजन केल्या जातात..
My school essay in marathi
कलेचा आवड असणारी विद्यार्थी कलाकार जॉईन करताना तिथे चित्रकला हस्तकला शिल्पकला आणि नृत्य या क्षेत्रातील कार्यशाळा आणि स्पर्धा आयोजित केली जातात. विविध क्लब आणि संघटना विद्यार्थ्यांच्या विकासामध्ये खूप महत्त्वाची भूमिका बजावतात हे क्लब मुलांना शैक्षणिक ज्ञान सोबतच जीवन कौशल्य आणि विविध अनुभव मिळवण्यास मदत करतात. हा परिच्छेद My school essay in marathi शाळेतील विविध उपक्रम असतात ते लिहिले आहे.
आमच्या शाळेत विविध सण आणि कार्यक्रमाचं आयोजन केले जाते. याचा कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वास व सामाजिक कौशल्यात वाढ होण्यास मदत होते. आमच्या शाळेमध्ये एक वार्षिक संमेलन आयोजित केले जाते ज्यात विविध क्लब मधील विद्यार्थी भाग घेतात या कार्यक्रमात नृत्य,नाटक,गायन आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थी त्यांच्या कलागुणांचे प्रदर्शन करतात. विद्यार्थ्यांना स्टेजवर सर्व विद्यार्थी व शिक्षकांसमोर परफॉर्म करायची संधी मिळते ज्यामुळे त्यांच्या आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.आमच्या शाळेत विविध सण साजरे केले जातात.स्वातंत्र्य दिन,गणतंत्र दिन पासून ते दिवाळी,होळीअसे सर्व सण साजरे होतात.सणांमध्ये विद्यार्थी विविध भाषण कविता प्रदर्शित करतात.सन साजरी केल्यामुळे विद्यार्थ्यांना एकमेकांच्या सणांची व परंपरेची माहिती मिळते व एकता व एकाची भावना निर्माण होते. हा परिच्छेद My school essay in marathi शाळेतील कार्यक्रम असतात ते लिहिले आहे.
शाळेत मला काही अतिशय चांगले मित्र मिळाले आम्ही एकत्र अभ्यास करतो घेतो आणि सांस्कृतिक उपप्रणाम मध्ये भाग देतो घेतो.वर्गातील प्रकल्प आणि गट कार्यामुळे अनुसार आम्हा सर्वांमध्ये संघ भावना विकसित होते आणि एकत्रितपणे काम करताना एकमेकांना मदत करतो आणि त्यातून मैत्री घट्ट होते. मला शाळेच्या स्पर्धेमध्ये भाग घ्यायला खूप आवडते. मी वादविवाद स्पर्धेत एकदा प्रथम क्रमांक मिळवला ज्यामुळे माझा आत्मविश्वास वाढण्यास खूप मदत झाली.मी शाळेच्या फुटबॉल टीमचा कॅप्टन आहे आणि मला फुटबॉल खेळायला खूप आवडते.शाळेने आयोजित केलेल्या स्वच्छता अभियानात भाग घेऊन मला स्वच्छतेचे महत्त्व समजले.हे विविध अनुभव माझ्या शाळेतील जीवनाला यादगार बनवतात. या अनुभवानी मला शैक्षणिक सांस्कृतिक व सामाजिक दृष्ट्यांनी मला विकसित केले आहे.
My school essay in marathi
शाळा ही प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अत्यंत महत्त्वाचा भाग असतो माझ्या शाळेतील अनुभव आणि आठवणी मला नेहमीच आयुष्यात प्रेरित करतात माझ्या शाळेची खासियत म्हणजे गुणवत्तेचे शिक्षण आणि विविध उपक्रम आणि स्पर्धा व कौशल्य विकास साठी घेतलेले विशेष प्रयत्न. या सर्वांनी माझ्या शाळेला खास बनवले आहे. हा परिच्छेद My school essay in marathi शाळेतील आठवणी बद्दल लिहिला आहे.
माझी शाळा वर एक कविता
ही आवडते मज मनापासुनी शाळा |
लाविते लळा ही, जसा माउली बाळा ||
हासऱ्या फुलांचा बाग जसा आनंदी |
ही तशीच शाळा, मुले इथे स्वच्छंदी |
हासुनी, हसवुनी, खेळुनी सांगुनी गोष्टी |
आम्हांस आमुचे गुरूजन शिक्षण देती ||
हे प्रेम कराया किती भोवती भाऊ! |
हातांत घालुनी हात तयांच्या राहू |
येथेच बंधुप्रेमाचे, घ्या धडे |
मग देशकार्य करण्याला, व्हा खडे ||
पसरवा नाव शाळेचे, चहूकडे |
मग लोक बोलतील “धन्य धन्य ती शाळा |
जी देशासाठी तयार करिते बाळा !” ||
लाविते लळा ही, जसा माउली बाळा |
मज आवडते मनापासुनी शाळा ||
वरील निबंध My school essay in marathi या विषयावर आहे.
तर मित्रांनो कसा वाटला माझी शाळा My school essay in marathi निबंध आवडला असेल तर जरूर कॉमेंट करा.
For More information on essay on Myself Essay in English : Link Here
खालील निबंध जरूर वाचा.
Thank You for your valuable time…!
3 thoughts on “माझी शाळा मराठी निबंध (400 Words) / My school essay in marathi”