itemtype="https://schema.org/Blog" itemscope>

joymarathi

Zade Lava Zade Jagva Essay in Marathi / झाडे लावा झाडे जगवा मराठी निबंध(३०० शब्दात): –

Zade Lava Zade Jagva Essay in Marathi

Zade Lava Zade Jagva Essay in Marathi

निबंध : झाडे लावा झाडे जगवा

रात्री अभ्यास करून जरा उशीराच झोपलो. मध्येच एका भयानक स्वप्नाने जाग आली. स्वप्नात मी पाहिले, एक हिंस्र राक्षसी मानव हातात धारदार खङ्ग घेऊन एका हिरव्यागार शालू नेसलेल्या नाजूक युवतीच्या मागे लागलाय. तो तिच्यावर सपासप वार करतोय तिचा भरजरी शालू फाटतोय! मी घाबरून त्या युवतीला नांव विचारले ती म्हणाली, “मी वसुंधरा, हा राक्षसी मानव माझ्या हिरव्या गार वस्त्रांवर, वैभवावर घाला घालतोय. मला उघडी बोडकी करतोय एवढं बोलून ती पळत सुटली. मी दचकलो, घाबरलो. घामानं डंवरलो. खरंच वसुंधरेनं मला म्हणजे पृथ्वीवरच्या नागरिकाला हाक दिली होती, तिला वाचवायला हवं. पृथ्वीवरची वनसंपदा वाचवायलाही हवी नि वाढवायलाही, ह्या विचाराने पुरता वेढलो.

शास्त्रीय संशोधनाच्या सहाय्याने मानवाची निसर्गावर मात करण्याची छटपट आहे. त्यामुळे मानवी जीवनाच्या विकासासाठी आवश्यक त्या सुविधांना तो महाग व्हायला लागलाय, निसर्ग हा मानवाचा मित्र असल्याचे तो पार विसरून मेलाय. त्याला आपल्या बुद्धीची घमेंड आहे. या बुद्धीच्या जोरावर तो भौतिक सुधारणांच्या शिखरावर जावून पोहोचलाय. तो निसर्गाला जुमानायला तयार नाही. त्याच्या या घातकी विचारसरणीमुळे तोच गोत्यात येतोय, त्याला जिवंत राहणेही दुरापास्त होवू लागले आहे. नाईलाजाने का होईना त्याला आपल्या कृतीचा उबग यायला लागलाय. त्यामुळे तो परत निसर्गाकडे वळू पहातोय. त्याची आराधना करण्याचं त्याच्या मनानं घेतलय. त्या चळवळीत तो आघाडीवर असणार आहे. ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’ हा मंत्र त्याला आठवायला लागलाय. ह्या परिच्छेदात Zade Lava Zade Jagva Essay in Marathi निसर्ग मानवासाठी किती महत्वाचा आहे ते लिहिले आहे.

खरं रं तर फुले-फळे-सावली देणाऱ्या, सर्वांना समानतेची वागणूक देणाऱ्या, मायेची ऊब देणाऱ्या वनस्पतींचे ऋण मानावे तेवढे थोडेच आहेत. त्यांच्या मुळेच प्राणवायू मिळतो, पाऊस पडतो, अन्नधान्य पिकते, वस्त्र, निवारा, लाकूडफाटा मिळतो, डिझेल, रबर, कात, डिंक, कागद, इमारतीचे लाकूड, औषधे सर्व काही वृक्षच तर देतात. निलगिरी, साग, वड, पिंपळ, शिरीष ही सदाहरित वनांमधली झाडे हवा शुद्ध ठेवतात. ताग, धेंचा, Gliricidia किंवा गिरीपुष्प ह्या वृक्षांच्या पानांचं खत उपयुक्त असतं. Acacia तर सर्वात जास्त ऑक्सिजन देणारा म्हणून प्रसिद्ध आहे. वृक्षांमुळे पावसाचे पाणी अडते. जमिनीची धूप थांबते. हे सारं माहीत आहेच.

हा निबंध सह्लेय विध्यार्त्यांकारिता Zade Lava Zade Jagva Essay in Marathi आहे.

वृक्ष माझी माता। वृक्ष माझा पिता।

सगासोयरा तो। सुखाचा निवारा त्राता ।।

हेही खरं आहे, पण हल्ली आपण हे विसरत चाललोय. वृक्षांवर सर्रास कुऱ्हाडी चालवून तेथे इमारती बांधतोय. अर्थात अनियंत्रितपणे वाढणारी बेफाट लोकसंख्या हे वृक्ष कमी होण्याचे मुख्य कारण आहे; पण गाई, म्हशी, शेळ्या, उंट आदि प्राण्यांच्या आक्रमणामुळेही वने कमी होत आहेत. महानगरे व कारखानेही वनसंपत्तीच्या दुरावस्थेला हातभार लावीत आहेत. उत्तर भारतात प्रतिवर्षी येणारे महापूर अवर्षणे हे हिमालयातील जंगलतोडीचे दृश्य परिणाम आहेत. वृक्षतोडीमुळे भूगर्भातील पेयजलही कमी होत चाललंय. हवामान चक्रही बदलते आहे.

हे थांबलं पाहिजे कुठेतरी, वृक्षराजीचं पुनरुत्थापन करून, प्रत्येकाने एक एक झाड आपल्या हातानं लावून लगेच श्रीगणेशा करायला हवा. शुभस्य शीघ्रम या न्यायाने. हे झाड मोठं होताना, हिरवगार बहरताना, किलबिलाटानं गजबजताना मन आनंदानं गुणगुणेल,

Zade Lava Zade Jagva Essay in Marathi वर छोटीशी कविता :-

झाड माझं विरंगुळ्याचं, घडीभरल्या भटकंतीचं

 पावसात थुई थुई नाचणारं, हृदयी लेणं सुगंधाचं

झाड माझं होईल कल्पतरू उबेचं नि सावलीचं

दहा दिशांनी बाहू पसरून, शिकविल बळ सामर्थ्याचं !

हा असा प्रवास जर एका झाडाचा असेल, तर झाडांची शाळा, विद्यालयं, विद्यापीठं… पर्यावरणाच्या प्रांगणात जादूच करून टाकतील नाही कां? म्हणूनच वृक्षारोपण हाच खरा तातडीचा सर्वोत्तम उपाय आहे. निमित्त कुठलेही असो झाड लावले गेले पाहिजे, वाढवले व जतन केले गेले पाहिजे. लग्न, मुंजी, एकसष्टी, वाढदिवस ह्या प्रसंगी एक एक रोप भेटीखातर द्यावे. शाळेतल्या हर एक विद्यार्थ्याला भावंड म्हणून झाड देण्यात यावे. सांभाळ करण्यासाठी. रस्त्याच्या दुतर्फा दाट झाडे दाटीवाटीनं उभी राहावीत पांथस्थांना प्रवाशांना सोबत सावली देणारी. अवघ्या दहा वर्षात पुनः एकदा, कवी मनातलं,

उभय बाजूने चित्र तरुंची दाट लागली छाया।

पांथस्थाला सुखकर मोठी श्रमहर मार्गी जाया ।।

हे दृश्य सत्यात यावं. एवढंच काय, सत्यनारायणाच्या पुजेबरोबर चौरंगावर रोप ठेवून वृक्षनारायणाचीच पूजा व त्याचीच पोथी वाचावी. प्रत्येक वृक्षाच्या ठायी साक्षात भगवंत वास करतो, असे स्वतः श्रीकृष्णाने अर्जुनास सांगितले आहे. भागवत सप्ताह साजरा करताना वृक्षांची महती सामुदायिक रित्या सांगावी व ऐकावी. प्रसाद म्हणूनही रोपवाटिकेतील रोप प्रत्येकाच्या हाती द्यावे.

ह्या परिच्छेदात Zade Lava Zade Jagva Essay in Marathi झाडाचे महत्व लिहिले आहे.

निबंध : झाडे लावा झाडे जगवा

झाडे लावा, झाडे जगवा’ ही मोहिम राबवणारे वृक्षमित्र मोहन धारिया घराघरात नि अण्णा हजारे गावागावात निर्माण व्हावेत. प्रदूषणाच्या भस्मासुराला धोपवून धरायचे असेल, पर्यावरणाचे बिघडलेले संतुलन सावरायचे असेल, तर वृक्ष लागवडीशिवाय पर्याय नाही. तर मग…

चला सोडवू दुष्काळाचे प्रदूषणाचे कोडे,

 चला वाढवू वनसंपत्ती चला लावू या झाडे

 काळही मोठा तातडी मोठी उपाय आहे साधा

 एकजुटीने वनीकरणाचा मार्ग प्रभावी साधा

प्रगतीच्या भरधाव रथाचे, हिरवे हिरवे झेंडे,

चला वाढवू वनसंपत्ती, चला लावू या झाडे ।।

साऱ्या जगभरात वनीकरणाचा वारू भरधाव दौडत आहे. चीनमध्ये प्रतिदिनी प्रतिहेक्टरी वनसंवर्धनासाठी नव्वद रुपये, जपानमध्ये तीनशे साठ रुपये तर भारतात एक रुपया व ऐंशी पैसे फक्त ! हे आकडे वाचून घाबरण्याचे कारण नाही. सरकार एकटे काय करेल, ह्याचा विचार करून व हा देश माझा मी देशाचा ही खूणगाठ मनाशी बांधून, प्रत्येक भारतवासियाने जर दररोज फक्त एक रुपया वृक्ष संवर्धनासाठी बाजूला ठेवून खर्च केला, तर भ्रष्ट पुढारीही लाजतील. सत्ताधीशही कामे हातात घेतील.

Zade Lava Zade Jagva Essay in Marathi वर चारोळी:-

शपथ घेऊया सारे मिळूनी पर्यावरणाचे पूजन करू ।

नच माज करू वनसंपत्तीचा, वृक्षांचा सन्मान करू ।।

बघता बघता परिसर, गावे, तालुका, जिल्हा, देश… व सारी वसुंधरा हरित, श्यामल होईल. तिचा शालू भरजरी हिरवा गार होईल आणि मग समर्थांच्या शब्दांत…

कामधेनूची खिल्लारे कल्पतरुंची वने आवारे

अमृताची सरोवरे, उचंबळतील ठायी ठायी ।।

जगात खाणारी तोंड भरमसाट वेगाने वाढली. त्यांना पोसण्यासाठी आवश्यक असणारे धनधान्य पुरेशा प्रमाणात पिकेनासे झाले आहे. जमिनीचा कस कमी व्हायला लागलाय. शेणखत, पालापाचोळ्याचे खत वापरण्याचे त्याला सूचायला तयार नव्हते. त्यामुळे सेंद्रिय खतांच्या वापरामुळे अल्पकाळात अधिक उत्पादनावर त्याने भर दिला. त्याच जीवन ‘हायब्रीड’ होऊ लागलं आहे. निसर्गाचा समतोल ढळायला लागलाय. Zade Lava Zade Jagva Essay in Marathi तो मार्गावर आणण्यासाठी वृक्षारोपण ही एक अपरिहार्य बाब म्हणून स्विकारावी लागलीय.

सारी मानवजातच वृक्षराजीवर बिधरली होती. त्यामुळे पाऊसमान वाजवीपेक्षा कमी झाला. त्यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष सुरू झाले. पिकासाठी पाणी नाही. पिण्यासाठी पाणी नाही. सारा हाहाक्कार उडाला हिरवीगार सृष्टीमाता उदांस झाली. तिच्यापासून मिळणारी सारी जंगलसंपत्ती अदृष्य होऊ लागली. Zade Lava Zade Jagva Essay in Marathi मानवी जीवन कंगाल होऊ लागले. या कंगाल जीवनाचे मंगल करण्यासाठी वृक्षांची लागवड आवश्यक वाटू लागली.

त्याहीपेक्षा महत्वाची बाब म्हणजे ‘कुन्हाडीचा दांडा गोल्यास काळ’ या म्हणीप्रमाणे वृक्षसंहाराने मानवी जीवनच गोत्यात यायला लागल्याचे जगातील शास्त्रज्ञांनी त्यांच्या लक्षात आणून दिले. त्यांच्या संरक्षणासाठी लागणारा प्राणवायुचा पुरवठा या विश्वातून कमी व्हायला लागला आहे. फाजीलपणा कवटाळून त्याने जास्त वृक्षतोड केली तर प्राणवायुशिवाय त्याला जीवनयात्राच संपवावी लागणार आहे. Zade Lava Zade Jagva Essay in Marathi त्यासाठी वृक्षारोपणाची उशीरा सुचलेली एक शक्कल आहे, अक्कल आहे. त्यासाठी तो धडपडायला लागलाय.

शासनाने वीस कलमी कार्यक्रमात या चळवळीला स्थान दिलय. त्यासाठी दिंड्या निधायला लागल्या आहेत. सामाजिक वनीकरणाचे ढोंग माजविण्याचे सुरू झाले आहे. ‘एक मूल एक झाड’ ही घोषणा सगळीकडे राबवण्यासाठी सक्ती करण्यात येत आहे. ही एक मानवाला जीवन देणारी चळवळ आहे. पण या चळवळीकडे म्हणावेसे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे लागवडीपेक्षा तोडीला प्राधान्य दिले जात आहे. लाच खावून वृक्षराजीचे खून पचविले जात आहेत अशा भ्रष्टाचारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना फाशीची सजा व्हायला पाहिजे त्याखेरीज मानवी प्रवृत्ती सुधारणार नाही.

वृक्षारोपण ही चळवळ मनापासून राबवायची चळवळ आहे. फक्त घोषणा देवून उपयोग नाही. कुटुंबनियोजनाच्या चळवळीप्रमाणे युद्धपातळीवरून प्रयत्न व्हायला पाहिजे. अधिक वृक्ष जगविणाऱ्याला कृषिपंडीत, कृषिमहर्षि पदव्या दिल्या पाहिजेत. जे शासकीय अधिकारी वृक्षारोपणासाठी तन, मन, धनाने राबून कामे करतील त्यांना बढती देताना अग्रक्रम दिला पाहिजे.

रेशन कार्डावर धान्य देतानाही त्याने या चळवळीत काय केलय त्याची दखल घ्यायला हवी. शहरी सुविधांचा वारेमाप उपयोग घेणाऱ्यावर वृक्षकर बसविला पाहिजे. त्या कराच्या उत्पन्नातून मोकळ्या जागेत वृक्षारोपण केले पाहिजे. Zade Lava Zade Jagva Essay in Marathi येथे लालफितीचा अडसर आडवा येता कामा नये. ज्या शेतकऱ्याच्या बांधाजवळ झाडे लागली असतील ती जगविण्याची जबाबदारी शासनाने त्याच्यावर सोपविली पाहिजे. त्यामुळे टैंकरने पाणी देण्याचे ढोंग बंद पडेल. फसवाफसवीला आळा बसेल. वृक्षराजी दिमाखाने विकास पावेल.

तर मित्रांनो कसा वाटला Zade Lava Zade Jagva Essay in Marathi निबंध आवडला असेल तर जरूर कॉमेंट करा.

For More information on essay on Zade Lava Zade Jagva in English : Link Here

खालील निबंध जरूर वाचा:

Thank You for your valuable time…!

4 thoughts on “Zade Lava Zade Jagva Essay in Marathi / झाडे लावा झाडे जगवा मराठी निबंध(३०० शब्दात): –”

Leave a Comment